ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार !
ठाणे - ठाणे महापालिकेच्या ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील मेट्रो कामांतर्गत हरदासनगर येथे व्हॉल्व स्थलांतरीत करणे तसेच साकेत ब्रिजखाली मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शचा व्हॉल्व बदली करणेसाठी महानगरपालिकेचा स्वत : चा पाणी पुरवठा व स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत शहरास होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक ०४ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ०९.०० ते शनिवार ० ५ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ० ९ .००वाजेपर्यंत २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.
दिनांक ०४ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ०९.०० ते शनिवार ० ५ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ० ९ . ०० वाजेपर्यंत शहरातील सिध्देश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रोड, कोठारी कंपाउंड, इंदिरानगर , लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेस्ट, कळव्याचा काही भाग व मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे .
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
.......................................
No comments:
Post a Comment