Saturday, 13 June 2026

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

** अपघात रस्त्यावरील खडेमुळे झाल्याचा रिक्षा युनियनच्या अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा आरोप.

मोहने, संदीप शेंडगे : मोहने परिसरातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला आणि सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे ओळख निर्माण करणारा प्रेम भाटी याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेम हा कमल हेअर स्टाईलचे मालक सोहन भाटी यांचा मुलगा होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रेम भाटी हा आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे परिसरातील युवकांमध्ये विशेष लोकप्रिय होता. त्याच्या रील्सना हजारो लोक पसंती देत होते. नेहमी हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना आपलंसं करणारा प्रेम आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोहने शिवसेना शाखेजवळील मोमोजच्या गाडीसमोर रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात घडला. संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले होते. याच कारणामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेंचुरी रेहान वर्कर्स युनियनचे व्हाईस चेअरमन आणि रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी या दुर्घटनेसाठी संबंधित ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. "रस्त्यावरील खडी वेळेत हटवली असती आणि योग्य खबरदारी घेतली असती तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता," तसेच असे त्यांनी रस्त्यावर खडी टाकणाऱ्या ठेकेदार आणि दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

प्रेम भाटीच्या निधनामुळे मोहने परिसरातील वातावरण शोकमग्न झाले आहे. सोशल मीडियावरही त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टचा पूर आला असून, मित्रपरिवाराने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेकांनी "हसतमुख प्रेम आता कायमचा निघून गेला" अशा भावना व्यक्त करत दुःख व्यक्त केले.

प्रेमच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. एका उमद्या, स्वप्नाळू आणि लोकप्रिय तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण मोहने परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

No comments:

Post a Comment

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !! ** अपघात रस्त्यावरील खडेमुळे झाल्याचा रिक्षा युनियनच्या अध्यक्ष श...