महात्मा फुले पोलिस स्टेशनचे सपोनि दिपक सरोदे यांनी केले अंमली पदार्थांचे रॅकेट उद्धवस्त !
कल्याण प्रतिनिधी : महात्मा फुले पोलिस स्टेशन चे सपोनि दिपक सरोदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे गांजा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे कळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत हुशारीने सापळा रचून तो इसम आरोपी रोशन पांडुरंग पाटील रा. मुंदाणे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यास २६,८८०/- रुपये किंमतीचा १.७९२ किलो ग्रॅम गांजा यासह अटक केली.
सदर गुन्हयाचा पुढील तपास अविश्रांतपणे व चिकाटीने पाठपुरावा करून सदर आरोपीस गांजा पुरवणारी महिला उषाबाई रमेश पाटील रा. साने गुरुजी कॉलनी, पारोळा, जिल्हा जळगाव येथून ताब्यात घेऊन तीला सदर गांजाचा माल विक्री करणारा अशोक इब्रु कंजर रा. स्वतःचे घर, ताडेपुरा, अंमळनेर जिल्हा जळगाव यास अटक केली त्यावेळी त्याच्या घरात ११६ ग्रॅम गांजा व ५० लिटर गावठी दारू आढळून आली ती जप्त करण्यात आली. पो.नि. गुन्हे संभाजी जाधव यांनी पुढील तपास चालू असल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी मा. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, मा. सहपोलिस आयुक्त सुरेशकुमार मेकला, मा. अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, मा. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, मा. सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार, वपोनि नारायण बनकर, पो.नि.गुन्हे संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोउनि जयवंत शिंदे, पोहवा किरण शिर्के, विजय भालेराव, पोना. सुनील भणगे, सुचित टिकेकर, मनोहर चित्ते, जितेंद्र चौधरी, सचिन भालेराव, पोशि. दिपक सानप, हासे, सोंगाळ यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment