Tuesday, 15 December 2020

भिवंडी मनपा च्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य सदनिकांचा लाभ मिळणार !

भिवंडी मनपा च्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य सदनिकांचा लाभ मिळणार !


भिवंडी, मोनिश गायकवाड : दि.१६ भिवंडी महानगरपालिकेच्या सेवेत जे सफाई कामगार आपल्या सेवेची २५ वर्ष पूर्ण झालेले आहेत व त्यापैकी ज्या कामगारांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत २७९ चौ फुटाच्या सदनिका मिळालेल्या नाहीत त्यांनी आस्थापना विभागात अर्ज करावेत असे आवाहन आस्थापना विभागाचे सहाय्यक आस्थापना प्रमुख यांनी केले आहे .अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे .

या योजनेचा लाभ सेवानिवृत्त कामगारांना सुध्दा मिळणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे .

भिवंडी महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती नंतर च्या कामगारांनी निवृत्ती, स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देणे कामी नुकताच विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरा दरम्यान सेवानिवृत्त व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना रजा वेतन ,निवृत्ती वेतन,अंशराशिकरण,गटविमा,वारसा हक्क अनुकंपाचे लाभ मिळाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते .त्या सोबत १२ व २४ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना आश्वासित प्रगती योजने नुसार लाभ मिळाला नाही त्यांनी १८ डिसेंबर रोजी अभिलेखाच्या कागदपत्रांची पूर्तता करून आस्थापना विभागात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...