टोकावडे येथे चोरांचा सुळसुळाट ! रात्रीचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी !
मुरबाड-{मंगल डोंगरे }तालुक्यातील टोकावडे नाक्यांवर चोरांचा सुळसुळाट झाला असून त्याला आळा घालण्यासाठी टोकावडे पोलिसांनी नाक्यावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात यावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या महिन्याभरापासून टोकावडे येथे चार चोऱ्या झाल्या असून एकही चोरीचा तपास लागला नाही एका महीलेची चैन ,एक मोटारसायकल,एका हाॅटेलचा फ्रिज ,खुर्चा व रात्री चक्क पत्रकार राजेश भांगे यांच्या गाडीचे डिझेल टाकी तोडून चोरी झाली आहे या बाबतीत..टोकावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे व पोलिस हवालदार नितीन घाग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आज पासून रात्रीचे पोलिस व्हॕन फिरुवून बंदोबस्त करण्यात येईल असे सांगण्यात आले .


No comments:
Post a Comment