भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड !
भिवंडी ,मोनिश गायकवाड : भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले आहे. यापूर्वी अग्रवाल विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले आहे. आजच्या महासभेत महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी श्यामजी अग्रवाल यांची सभागृह नेतेपदी घोषणा करून त्यांचे अभिनंदन केले आहेत. यापूर्वी सभागृह नेते म्हणून विलास आर.पाटील हे कार्यरत होते.विलास पाटील यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती केल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले. महापौर प्रतिभा पाटील, उपमहापौर इम्रान वली मोह. खान, स्थ्यायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे, सर्व पक्षीय गटनेते, सर्व उपस्थित सदस्य यांनी शामजी अग्रवाल यांचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment