Tuesday, 8 December 2020

राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार- २०२० चे "संजय नार्वेकर आणि सुषमा तांबडकर" मानकरी !

राष्ट्रीय समाज सेवा रत्न पुरस्कार- २०२० चे "संजय नार्वेकर आणि सुषमा तांबडकर" मानकरी !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
             कोरोना काळामुळे राष्ट्रीय समाज सेवा रत्न- २०२० सन्मान सोहळा यावेळी ग्लोबल ह्युमन राईट्स फाउंडेशनतर्फे ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. देशातील सामाजिक, शिक्षण, औषध, क्रीडा , विज्ञान, व्यवसाय यासारख्या महत्वाच्या विषयांवर काम करणार्‍या निवडक व्यक्तिमत्त्व आणि संस्था यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्यक्षात काही महिन्यांपासून, संस्था सतत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कामाची तपासणी करत होती. त्यातूनच मुंबईत राहणाऱ्या दोन व्यक्तींना राष्ट्रीय समाज सेवा रत्न-२०२० पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली अनेक वर्षे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संजय विलास नार्वेकर व सुषमा गोविंद तांबडकर यांना ग्लोबल ह्युमन राइट्स फाउंडेशन कडून राष्ट्रीय समाज सेवा रत्न-२०२० हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यंदा देशावर कोरोनाचे सावट असल्याने यावेळेस हा पुरस्कार ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात आला. या मधून मुंबईतून संजय नार्वेकर आणि सुषमा तांबडकर यांची निवड करण्यात आली. कोरोनामुळे आयोजकांनी कार्याची दखल घेत पुरस्कार स्वतःहून घरी आणून देत त्यांचा सन्मान केला. फुटपाथ वर राहणारे गोरगरीब, आदिवासी पाड्यातील तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे उद्दिष्ट ठेवत संजय नार्वेकर आणि सुषमा तांबडकर यांनी सामाजिक कार्याला अनेक वर्षे झोकून दिले. आज शेकडो अनाथ तसेच फुटपाथ वर राहणारे बेघर मुले शिक्षणाचा आधार घेत आहे.

No comments:

Post a Comment

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !! मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच...