माणगांव तालुका कृषि विभाग राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत नाईटणे येथे शेतकर्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मंगळवार दिनांक ०८/१२ /२०२० रोजी मौजे-नाईटणे येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत मृद चाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धती याविषयी शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास तालुका कृषी अधिकारी श्री. पवार सर, कृषीसंशोधन केंद्र रेपोली येते कार्यरत असलेले शास्त्रज्ञ श्री. दडेमल सर तसेच नाईटणे गावातील शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणामध्ये श्री. दडेमल सर व नाईटणे गावाचे कृषी सेवक शेंडे सर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्य व तिची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री. पवार सर व कृषी सेवक सुरडकर सर, कृषी सेवक उगले सर, कृषी सेवक गावडे सर, कृषी साह्यक शिदे सर, कृषी सेवक कदम सर, कृषी पर्यवेक्षक शिंदे सर यांनी सर्वानी कृषिविभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचे व शंकांचे निरसन केले.अखेरीस सर्वानी भोजनाचा लाभ घेऊन प्रशिक्षणाची यशस्वीरीत्या सांगता झाली. सदरील प्रशिक्षण यशस्वी ठरविण्यासाठी नाईटणे या गावातील ६१
शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित राहिले होते.

No comments:
Post a Comment