Wednesday, 13 January 2021

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेची होणार शानदार सुरुवात !

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेची होणार शानदार सुरुवात !


कल्याण :- कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी व स्पोर्ट्स केयर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वर्गीय यशवंतराव ओंबासे (पोलीस हवालदार)" यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यातील चौथी दहा वर्षाखालील खेळाडूंसाठी *मास्टर ट्रॉफी टी-20* व 12 वर्षाखालील *लिटिल चॅम्प्स टी-20* या क्रिकेट स्पर्धे ची सुरुवात 17 जानेवारी रविवारी रोजी सकाळी 10 वाजता संतोष स्पोर्ट्स क्रिकेट ॲकॅडमी क्रीडांगण डॉन बॉस्को शाळेत जवळ आधारवाडी कल्याण पश्चिम येथे करण्यात येणार आहे..
गेल्या चार वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये दहा वर्षाखालील व बारा वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेमधून छोट्या मुलांना क्रिकेटमध्ये वाव मिळावा तसेच छोट्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले..  या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला कल्याण चे काँग्रेस चे माजी आमदार श्री संजय दत्त  व महाराष्ट्र युथ कांग्रेस चे उपाध्यक्ष मा श्री ब्रिज किशोर दत्त जी आंतरराष्ट्रीय खेळाडू व ताइक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया सहसचिव संदीप ओंबासे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे या प्रसंगी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे संचालक संतोष पाठक व प्रशिक्षक महेंद्र देशमुख,  व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...