Tuesday, 12 January 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसी समाजावर अंनत उपकार आहेत - युवा समाजप्रबोधनकार !!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसी समाजावर अंनत उपकार आहेत - युवा समाजप्रबोधनकार !!


कल्याण (संजय कांबळे) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी आपल्या समाजापेक्षा हिंदू समाजावर पर्यायाने ओबीसी समाजावर अंनत उपकार केले आहेत. त्यांनी हिंदू कोड बिल पास करून हे सिध्द केले आहे. असे वक्तृत्व युवा प्रबोधनकार आणि ओबीसी समन्वय समितीचे रायगड जिल्हा सचीव रोशन पाटील यांनी केले.


कल्याण तालुक्यातील उशीद गावी आयोजित राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त  जंयती कार्यक्रमात ते बोलत होते.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बारा बलुतेदार अर्थात ओबीसी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. शेतकऱ्यांसाठी पहिला मोर्चा बाबासाहेबांनी काढला, कामगार, महिला कष्टकरी यांना जो आज लाभ मिळतो आहे. बाबासाहेबामुळे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज घडले ते जिजामाता यांच्या मुळे, केवळ महाराजच नव्हे तर दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर देखील जिजाऊ माँसाहेब यांनी संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते, ते गो ब्राम्हण प्रतिपालक नव्हते. आपल्याला खोटा इतिहास शिकवला जातो व खरा इतिहास लपविला गेला होता. असे बोलून आज महिला गल्ली पासून ते दिल्ली येथील पोहचल्या आहेत ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांती मुळे हे विसरता कामा नये. परंतू जातीयवादी लोकांनी स्वतः च्या सोईसाठी या महापुरुषांना वेगवेगळ्या सताजात वाटून घेतले, जातीय दंगली घडवल्या. व आपला स्वार्थ साधवून घेतला व घेतात. त्यामुळे ओबीसी समाजाने शिक्षण घ्यायला हवे असे सांगून प्रत्येक वेळी ओबीसी समाजासाठी कित्येक कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पण ते ग्रामपंचायती पर्यंत आले नाही तर ते निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या घशामध्ये गेले असा घणाघाती आरोप करीत येत्या २ ०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत फार्म मध्ये ओबीसी असा रकाना नसल्याने कोणीही जनगणना फार्म भरु नये असे अवाहन केले.
यावेळी आधार फाउंडेशन चे डॉ अमित दुखंडे, विवेक भोपी यांची भाषणे झाली. तर या कार्यक्रमाला राजाराम घोलप, कोकण विभागीय अध्यक्ष ओबीसी संघटना, ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोशे, भोसरी ग्रामपंचायत चे सरपंच महादेव गोर्ले, निर्माण फाऊंडेशन चे राजेश पवार, उशीद गावचे सरपंच प्रवीण भोईर, पत्रकार संजय कांबळे, सुरेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड जयश्री वाघिरे तर सुत्रसंचालन रुपाली पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर वाघिरे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...