" स्वच्छतेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आमदार किसन कथोरे यांचे आवाहन" !
मुरबाड-(मंगल डोंगरे) : २०२० हे वर्षे कोरोना महामारीत गेले यात अनेकांची कुटूंबेउध्वस्त झाली,अनेकांना आपला जिव गमवावा लागला तर अनेकांची प्रचंड आर्थिक हानी झाली त्यामुळे येणारे नविन वर्षे २०२१ हे चांगल्या पद्धतीने सुखाचे ,उत्तम आरोग्याचे जावो तसेच नविन वर्षाची सुरुवात स्वच्छतेचा मंञ व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शपथ देऊन करावी यासाठी आज १ जानेवारीला सकाळी मुरबाड शहरात नगरपंचायतच्या वतिने रॕलीचे आयोजन केले होते. शहरातील रस्ते चकाचक साफ करुन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर रांगोळ्यांनी नविन वर्षाचे स्वागत केले. गेले अनेक महिने मुरबाड शहरात दर शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरत असणारा आठवडी बाजार बंद होता व मुरबाड बाजारपेठ सुद्धा शुक्रवारी बंद असायची ती सुरु करण्याची मागणी केली जात होती ती सुद्धा आज नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली म्हणून आज सकाळी मुरबाड मधे" स्वच्छता रॕली "चे आयोजन केले होते या रॕलीत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे सहभागी झाले होते.
यावेळी आमदार कथोरे यांनी मुरबाड नगरपंचायत चे कौतुक केले व भविष्यात मुरबाड नगरपंचायत राज्यात स्वच्छते मधे नंबर १ वर आणन्यासाठी नागरिकांनी नगरपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले. स्वच्छतेची सुरुवात स्वःता पासुन करा तरच शहर स्वच्छ राहिल भविष्यातिल मुरबाड फार वेगळा व स्वच्छते मधे नंबर १ असेल असे मत यावेळी आमदार कथोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान दुय्यम शिक्षण संस्था मुरबाड येथे '' माझी वसुंधरा अभियान २०२१ " या मोहिमे अंतर्गत प्रतिद्नेचे वाचन करण्यात आले. ही रॕली नगरपंचायतचे प्रवेशव्दार येथुन सुरुवात होऊन छञपती शिवाजी महाराज चौक येथे छञपतींना अभिवादन करुन संपविण्यात आली.
या रॕलीमधे नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे , भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव , सरचिटणीस नितीन मोहपे , शहराधक्ष सुधिर तेलवणे ,जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस ज्योती ताई गोडांबे'शिल्पा देहरकर ' तालुका सरचिटणीस जयवंत कराळे , दिलीप देशमुख , माजी नगराध्यक्ष मोहन सासे ,माजी उपनगराध्यक्ष-नारायण गोंधळी' शितल तोंडलीकर , छायाताई चौधरी , मा. उपनगराध्यक्षा अर्चना विशे , साक्षी चौधरी,उर्मिला ठाकरे , वसंत जाधव यांच्यासह "मी पण स्वच्छता ग्रही" कार्यक्रम राबविणारे स्वच्छता दुत यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment