Friday, 1 January 2021

कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभासाठी तब्बल सव्वीस उमेदवारी अर्ज!

कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभासाठी तब्बल सव्वीस उमेदवारी अर्ज!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीच्या तीन प्रभातील ९सदस्या साठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये कल्याण पंचायत समितीच्या माझी उपसभापती योगेश शेठ धुमाळ यांचाही समावेश आहे. 
टिटवाळा शहरानजीक आणि गोवेली शहापूर रस्त्याच्या बाजूला घोटसई ग्रामपंचायत आहे राजकीय दृष्टीने ही ग्रामपंचायत महत्त्वाची मानली जाते. याच गावातील उद्योजक योगेश धुमाळ यांनी कल्याण पंचायत समिती चे उपसभापती पद समर्थ पणे सांभाळले होते. ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत. तर याच गावातील चितांमण मगर यांच्या पत्नी रेश्मा मगर या ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. अशा पद्धतीने या गावाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 
या ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील ९ सदस्यासाठी तब्बल २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये वैद्य ठरलेले वार्ड क्रमांक १ मध्ये गुरुनाथ मगर, सचिन पवार, सविता मगर, राजू मगर, मनोज धुमाळ, रोशनी धुमाळ, सुयोग मगर, वार्ड २मध्ये सोमनाथ गायकर, सूषमा मगर, उर्मिला मगर, वैशाली पानसरे, योगेश धुमाळ, संतोष धुमाळ, सविता मगर, वनिता मगर, आणि वार्ड नंबर ३ मध्ये निलिमा प्रकाश भगत, दया रविंद्र मगर आदी असे एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ९ सदस्य पदाकरिता १हजार ४२६ पुरुष तर १हजार १९४ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे आज पासून म्हणजे १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२१ पर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून कोण उमेदवार मागे घेतात यावरून अंतिम लढत होणार आहे.
त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !! मुंबई, दि. ९...