मुरबाड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती मध्ये उद्या होणा-या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! .
मुरबाड (मंगल डोंगरे) :
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक उद्या शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी पार पडत आहे. या निवडणुकी साठी तहसील व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी मात्र केली आहे.
मुरबाड तालुक्या मधील निवडणूक होत असलेल्या ४४ ग्रामपंचायती पैकी जवळपास ५ ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आहेत. उद्या उर्वरीत ३९ ग्रामपंचायती मधील १६० जागां साठी मतदान होणार आहे. मुरबाड तालुक्यातील शेलारी, आगाशी, डेहनोली,कळमखांडे, मासले या ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी काही ग्रामपंचायती मध्ये २ ते ३ जागांसाठी निवडणूक होत आहे. ह्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात राजकिय लोकांना अपयश आले आहे.उद्या होणारी मतदान प्रक्रिया ही ३९ ग्रामपंचायती मधील १६० जागां साठी होणार असून त्या साठी प्रशासणाने ८७ मतदान केंद्रे उभारली आहेत. शांततेत व भयमुक्त वातावरणात उद्या मतदान पार पडेल असा विश्वास प्रशासणाने या वेळी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment