Thursday, 14 January 2021

मुरबाड मधे जिजाऊ 'सावित्री आणि स्वामी विवेकानंद 'यांच्या संयुक्त जन्मोत्सवा निमित्त " रंगला "प्रबोधनाचा कार्यक्रम !!

मुरबाड मधे जिजाऊ 'सावित्री आणि स्वामी विवेकानंद 'यांच्या संयुक्त जन्मोत्सवा निमित्त " रंगला "प्रबोधनाचा कार्यक्रम !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : स्वराज जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ 'माता सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमीत्ताने तसेच जयंतीचे औचित्य साधून संयुक्तिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम मुरबाड शहरातील श्रीनरेंन्द्र रेसिडेन्सी गणेशनगर येथे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेंचे पूजन करुन अभिवादन केले. उपस्थित महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकून इतिहासाला उजाळा देण्यात आला. आज प्रत्येक घरा - घरात जिजाऊ, सावित्रीचे विचार पोहचले पाहिजेत आजच्या मुलांना, तरुण पिढिला याच विचारांची खरी गरज आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.   

                
अॕडव्होकेट वैशाली घरत (जगताप) यांनी महिला अत्याचार व कायदे या विषयी मार्गदर्शन केले तर अजिंक्य कसबे यांनी " मि पण स्वच्छाग्रही " तर मृणाल सापळे यांनी आपल्या प्रश्नावर बोलू काही अशा वेगवेगळ्या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.                     या कार्यक्रमाला मुरबाड नगरपंचायतच्या मा.नगराध्यक्षा छाया चौधरी ,मा. उपनगराध्यक्षा अर्चना विशे , प्रा. शिक्षक भालचंद्र गोडांबे उपस्थित होते. तर या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यां ज्योती गोडांबे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...