कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीचे एकशे चौसष्ट 'कारभारी लय भारी' ठरवणार मतदार !!
कल्याण (संजय कांबळे) : २१ ग्रामपंचायती पैकी वरप ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने राहिलेल्या २० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ८२ मतदांन केंद्रातून सुमारे ५२ हजार ९३९ मतदार १६४ "कारभारी" लय भारी निवडणार आहेत.
कल्याण तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि अनेकानी निवडणूकीच्या रिंगणात उड्या मारल्या. घाईगडबडीत अनेकांचे फार्म बाद झाले. तर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी फक्त वरप ग्रामपंचायतीत तडजोड अंती बिनविरोध झाली. बाकी २० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तब्बल ३७८ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले. २० ग्रामपंचायतीच्या १६४ जागांसाठी ही लढत होत असून उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी कल्याण तहसीलदार कार्यालय अर्थात निवडणूक निर्णय अधिकारी दिपक आकडे व त्यांची टिम सज्ज झाली आहे.
याकरिता ८२ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून २८ हजार ३१८ पुरुष तर २४हजार ६२० स्त्री व १इतर मतदार असे एकूण ५२ हजार ९३९ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे याकरिता पीआर ओ ८२,पी ओ वन ८२, पीओटू ८२,पीओथ्री ८२, शिपाई ८२ राखीव कर्मचाऱ्यांमध्ये , पी आर ओ १०,पीआर ओ १,२,३,अनुक्रमे १०,१०,१०,आणि शिपाई १० असे कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.
तालुक्यातील २० ग्रामपंचायतीचा आढावा घेतला तर आपटी मांजर्ली १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, आणे भिसोळ १४,बापसई नवगाव ८,बेहरे ४०, घोटसई १४, गोवेली रेवती १४, गुरवली २०,जांभूळ १६, कांबा २८, खोणी २५, मानवली २०, म्हारळ ४३, म्हसकळ १५,नडगाव दांणबाव २०, निंबवली मोस १४, राया ओझर्ली १५, रायते पिंपळोली २१,सांगोडा कोंढेरी १९, उतणे चिंचवली ८आणि वडवली शिरडोण १२ उमेदवार मैदानात उभे राहिले आहेत. उद्या मतदान असल्याने आज संध्याकाळी देवाण घेवाण, आणाभाका, बेलभंडारा, बाहेरच्या गावी गेलेल्या मतदारांना आण्याची सोय, त्याचे नियोजन, बाजारभाव याची बेरीज वजाबाकी होणार असली तरी पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे याचा विचार उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी करायला हवा. तर मतदान हे श्रेष्ठ दान आहे,ते निर्भयपणे, कोणालाही न घाबरता करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दिपक आकडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment