Thursday, 14 January 2021

म्हारळ येथील लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेचा मोठा निर्णय !!

म्हारळ येथील लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेचा मोठा निर्णय !!


कल्याण, (संजय कांबळे) :
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या म्हारळ गावातील लिटिल स्टेप मेमोरियल स्कूल शाळेचे संस्थापक प्रा. श्री. भगवान पेखळे सर यांनी म्हारळ गावातील सर्वसामान्य पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. इयत्ता १ ली ते १२ वी ( इंग्रजी माध्यम ) परवानगी असलेल्या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलमध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व२०२१-२२ मध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी  फी दरामध्ये 50%टक्के सवलत देणारा धाडसी निर्णय संस्थाचालकांनी घेतला आहे. शैक्षणिक फी बरोबरच दोन शालेय गणवेश व स्कूल बॅग फ्री देण्याचाही निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य स्तरातील विद्यार्थी व पालकांच्या समस्या लक्षात घेऊन कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे स्पष्ट मत संस्थाचालकांनी  मांडले आहे. सर्व थरातील पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाची चर्चा सर्वांमध्येच पसरली आहे. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच खालील पत्त्यावर संपर्क करावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका 'सौ. गिता पेखळे मॅडम यांनी केले आहे'. 
       
संपर्क क्रमांक:-9922480335/7387634677.या नंबर वर 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...