Saturday, 9 January 2021

कुणबी समाजोन्नती संघ शाखा माणगांव च्या वतीने पदविका परीक्षेत अव्वल स्थान पटकावलेल्या साक्षी बटवलेंचा सत्कार !

कुणबी समाजोन्नती संघ शाखा माणगांव च्या वतीने पदविका परीक्षेत अव्वल स्थान पटकावलेल्या साक्षी बटवलेंचा सत्कार !


    बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ माणगांव लोणेरे अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रो केमिकल्स इंजिनिअरिंग पदविका परीक्षेत ९९ . ५० टक्के गुण मिळवून संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील व्हावे गावातील कुमारी साक्षी बाबू बटवले यांचा गुणगौरवात्मक सत्कार त्यांच्या राहत्या घरी शनिवार दिनांक ०९ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका माणगाव मुंबई चे वतीने करण्यात आला. 
        सदर सत्कार कार्यक्रम माणगांव तालुक्यातील व्हावे गावातील साक्षी बटवले यांच्या निवासस्थानी कुणबी समाजोन्नती संघ माणगांव अध्यक्ष श्री सखाराम पोटले, उपाध्यक्ष जानु डोंगरे, सहचिटणिस राजु पालकर, खजिनदार गणेश साळवी आणि एक नंबर ग्रुपचे अध्यक्ष सुरेश मोडे साहेब व साक्षी बटवले यांचे आई-वडील तसेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...