Sunday, 10 January 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांच्या हस्ते टिम कलाकारांचा सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांच्या हस्ते टिम कलाकारांचा सत्कार!


कल्याण (संजय कांबळे) : बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुसज्ज सैन्य दलाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांते वंशज "विलासराव जयसिंगराव मोहिते" यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण मुंबई चे सातारा टिम चा आणि शाहिर पोपटराव वाघमारे सत्कार ऐतिहासिक अशा तळबीड भूमीत नुकताच घेण्यात आला. 


मुंबई कल्याण येथील एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सुपरहीट मराठी साॅग साठी सातारा जिल्ह्यातील बेलवडे या गावातील मोलमजुरी, गंवडी, सेंटरींग आणि ऊसतोड अशी कष्टांची कामे करणा-या नामदेव बल्लाळ, मोसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर यांची निवड झाली. आणि त्यांनी त्यांच्या जिद्दीने टिम मध्ये चांगले स्थान मिळविले. यांनी मुंबई टिमच्या साक्षी पाटेकर, दिव्या गायकवाड, गौरी पाटील, वैष्णवी धायगुडे बालकलाकार हिंमाशू कांबळे यांच्या तोडीस तोड अभिनय व डांन्स केला आहे त्यामुळे सध्या हे गाणे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे त्यामुळे या कलाकारांनी सातारा जिल्ह्याचे पर्यायाने कराड तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चमकवले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जन्मभूमीत जन्मलेले शाहिर पोपटराव गावडे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या बॅनर काम करण्याचे म्हणजे आपली गाणे देण्याचे मान्य केल्याने त्यांचा व टिमचे कलाकार नामदेवराव बल्लाळ, मोसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर यांचा सरसेनापती चे वंशज विलासराव मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी या कार्यक्रमासाठी राहूल शिवदास, उपाध्यक्ष भाजपा, कराड उत्तर, श्रीमती नंदा वाघमारे, यशोधरा महिला सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा, निलेश शिरसाठ, समीर वाकळे, शिवाजी वाघमारे, नानासो भिंगारदिवे, योगेश झेंडे, दत्तातय पवार, वैभव पवार, रविकिरण पवार, आबासो वाघमारे, शैलेश वाकळे, दिलीप वाघमारे, प्रकाश वाघमारे, वंदना वाघमारे, सविता मस्के आशा वाघमारे, गणेश गायकवाड राहूल वाघमारे शुभम वाघमारे, प्रज्ञा वाघमारे आदी उपस्थित होते . या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदा वाघमारे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेचे नवीन सदस्य दयानंद वाघमारे यांनी खूप मेहनत घेतली होती.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...