Monday, 11 January 2021

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे माणगांव प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन !

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे माणगांव प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन !


    बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : सरकारने शेतकर्यांच्या विरोधात बनवलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशातील शेतकरी वर्ग पुर्ण पणे उध्वस्त होणार आहे. तसेच सरकारने केलेल्या कामगार विरोधी कायद्यांमुळे देशातील सर्व कामगार वर्ग देशोधडीला लागून तोही पुर्ण पणे उध्वस्त होणार आहे. आणि यावर अवलंबून असणारे सर्व समाज घटक यामुळे कोलमडून पडणार आहे. 
     सरकारने हे शेतकरी व कामगार विरोधी देशविघातक कायदे तात्काळ मागे घेण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून संपूर्ण भारतातील ५५० जिल्ह्यांमध्ये ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२१ या सात दिवसीय कालावधीत श्रृंखला बद्ध  तथा साखळी पद्धतीने देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित केले आहे. 
     सदर धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या देशविघातक शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सोमवार दिनांक ११ जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
     सदर धरणे आंदोलनात इंदापूर माणगांव युनिट चे मिलिंद भोलानाथ साळवी, राकेश मोरे, म्हसळा युनिट चे संदीप जयराम गायकवाड, म्हसळा युनिट चे वैभव विनोद शिगवण, शंकर दौलत कापडी, संदेश अनंत शिगवण, महादेव गोपाळ कासरुम,महादेव पांडुरंग निकम, विजय जयराम मोटे, महेश घनश्याम जाधव म्हसळा, तेजस सुर्यकांत कासे माणगांव युनिट, रामदास गो. मोरे इत्यादींनी सक्रिय  सहभाग होता.

No comments:

Post a Comment

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !! ** चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार...