Monday, 11 January 2021

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव - 'राष्ट्रीय प्रयोगशाळा अहवालात शिक्कामोर्तब'

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव  - 'राष्ट्रीय प्रयोगशाळा अहवालात शिक्कामोर्तब'


ठाणे : काही दिवसांपासून संशयास्पद रीतीने मृत्युमुखी पडत असलेल्या पक्ष्यांच्या RTPCR चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीज (NISHAD) यांचेकडे पाठविलेल्या पक्ष्यांच्या मृतदेहांचे शव विच्छेदन प्राथमिक चाचणीत ३ पानबगले व १ पोपट यांचा मृत्यू एव्हियन इन्फ्लुएंझा अर्थात बर्ड फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


ठाण्या व्यतिरिक्त मुंबई परभणी दापोली व बीड येथील मृत पक्ष्यांच्या नमुन्यांचेही प्रयोगशाळा अहवाल  प्राप्त झाले असून या सर्व पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू मुळेच झाल्याचे सिद्ध झाले आहे. यातील बीड वगळता इतर सर्व शहरांतील पक्ष्यांमध्ये H5N1 विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे तर बीड येथील नमुन्यांमध्ये H5N8 विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. 

H5N1 विषाणू पक्ष्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो तर H8N1 या विषाणूंचा संसर्ग पक्ष्यांमधून माणसांमध्ये सहजासहजी संक्रमित होऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !! ** चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार...