Tuesday, 12 January 2021

माणगांव येथे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आयोजित मॉ साहेब जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले संयुक्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न !

माणगांव येथे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आयोजित मॉ साहेब जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले संयुक्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आपल्या महानायिकांनी पेटवलेली क्रांतीची मशाल कायमस्वरूपी निरंतर तेवत ठेवण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून महिलांना जागृत ठेवण्यासाठी राजमाता मॉ साहेब जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधन शिबीर अंतर्गत राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या माध्यमातून माणगांव कुणबी भवन येथे मंगळवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी दुपारी ०२ ते ०५ या वेळेत राजमाता मॉ साहेब जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या शानदार संयुक्त जयंतीचे आयोजन माननीय बी. आर. आडे सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 
      सदर संयुक्त जयंती सोहळ्याचे उदघाटन माणगांव तालुक्याच्या प्रांत अधिकारी माननीय प्रशाली जाधव - दिघावकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर माननीय प्रांताधिकारी प्रशाली जाधव - दिघावकर मॅडम यांनी या संयुक्त जयंतीच्या अनुषंगाने उपस्थितांना उद्बोधित केले. या सुनियोजित शानदार संयुक्त जयंती सोहळ्यास माणगांव तालुका गट शिक्षणाधिकारी डॉ. सुनिता चांदोरकर मॅडम, माणगांव तालुक्यातील सुप्रसिद्ध मधुमेह आणि हृदय रोग चिकित्सक डॉ. सुवर्णा राठोड मॅडम, डॉ. पाटणकर मॅडम, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या रायगड जिल्हा महासचिव मा. रेखा इंगळे मॅडम, डॉ. माधुरी राजेशिर्के, डॉ. डोंगरे मॅडम, मा. गायत्री घोणे मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली होती. 
      सदर कार्यक्रम कार्यक्रमास डॉ. वर्षा माळी मॅडम, मा. उर्मिला कांबळे मॅडम आणि मा. उमा तारु मॅडम यांनी प्रमुख वक्तागण म्हणून उपस्थितांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. या संयुक्त जयंती सोहळ्यास माणगांव तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील महिला वर्गाच्या उपस्थितीत सदर संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
      सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रा. डॉ. संगीता मेटकर मॅडम, पुनम पवार मॅडम, विधी जाधव मॅडम, प्रा. सुवर्णा धोंगडे मॅडम, जोत्सना हाटे मॅडम, प्रा. स्वप्ना बर्फे मॅडम, रंजना गाडे मॅडम, प्रा. डॉ. सोनाली म्हात्रे मॅडम, फातिमा करदेकर मॅडम, मनिषा कांबळे मॅडम, प्रा. साधना हिवरे मॅडम, रुपाली साळवी मॅडम, झारीना परदेशी मॅडम, शितल मोरे मॅडम, वर्षा गायकवाड मॅडम, शिला पटाईत मॅडम, शोभा जाधव मॅडम आणि रंजना कोळेकर मॅडम इत्यादिंनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !! ** चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार...