मकर संक्रात निमिताने कुणाल सरमळकर यांच्याहस्ते स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे ग्रीएवन्सस सेल और हेल्प सेंटर जम्मू ,काश्मीर या सेंटरचे उद्घाटन !
"महाराष्ट्राचे राज्य संसदीय कार्य व परिवहनमंत्री मा. अँड डॉ.अनिल परब यांचे मोलाचे मार्गदर्शन"
मुंबई, (समीर खाडिलकर/ शांत्ताराम गुडेकर) :
महाराष्ट्र राज्य संसदीय कार्य व परिवहनमंत्री मा. अँड डॉ.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रात कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेनाचे अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या हस्ते जम्मूमध्ये शिवसेना स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे ग्रीएवन्सस सेल और हेल्प सेंटर जम्मू और काश्मीर या प्रशिक्षण सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरमध्ये गरजवंतांना मोफत शिलाई क्लास तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशिनसह अन्य साहित्य पुरवठा केला जाणार आहे. यावेळी जम्मू और काश्मीर राज्यचे शिवसेना राज्यप्रमुख मनीष सहानी व शिवसेना महिला राज्यप्रमुख सौ. मिनाक्षी चिब्बेर, शिवसेना राज्य सरचिटणीस विकास बक्षी व सल्लागार समिती अध्यक्ष राकेश गुप्ता, सौ.गीता लोकोहत्तरा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. अनेकांकडून या महत्वपुर्ण महिलांना स्वावलंबी बनवणा-या उपक्रमाचे स्वागत करत उपक्रम राबवणा-यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याउपक्रमामुळे बेरोजगारी नक्कीच कमी होण्यास मदत होईल असे मत अनेकांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment