Friday, 15 January 2021

कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीसाठी सरासरी ***साठ ते चौसष्ट टक्के मतदान म्हारळ ग्रामपंचायतीत कमी मतदान, वडवली शिरडोण टाॅपर?

कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीसाठी सरासरी ***साठ ते चौसष्ट टक्के मतदान म्हारळ ग्रामपंचायतीत कमी मतदान, वडवली शिरडोण टाॅपर?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६४ जांगासाठी आज झालेल्या निवडणुकीत सरासरी ६०/६४ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक कमी मतदान तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या म्हारळ ग्रामपंचायतीत झाले तर सर्वात जास्त मतदान वडवली शिरडोण या ग्रामपंचायतीत झाले आहे. त्यामुळे म्हारळ मधील कमी मतदान कोणाच्या पथ्यावर व कोनाच्या माथ्यावर पडणार हे दोन तीन दिवसात निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे.


कल्याण तालुक्यातील एकमेव वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे वरप सारखी ग्रामपंचायत बिनविरोध होते तर तालुक्यातील इतर ग्रामपंचायती का बिनविरोध होत नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली असतानाच काही लोकांच्या हटवावी भूमिकेमुळे इतर २० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तयारी सुरू झाली. एकूण १६४ जांगासाठी सुमारे ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. सर्वाधिक उमेदवार हे म्हारळ व बेहरे ग्रामपंचायतीत उभे राहिले होते. त्यामुळे इतर ग्रामपंचायती तरी बिनविरोध व्हायला हव्या होत्या. पण कोणीही जास्त प्रयत्न केले नाहीत. याचा परिणाम म्हणजे निवडणुका जाहीर असा झाला.
२० ग्रामपंचायतीच्या १६४ जांगासाठी आज सकाळी सुरु झालेल्या प्रत्यक्ष मतदानासाठी २८हजार ३१८ पुरुष व २४ हजार ६२० महिला मतदार मतदान करणार होते. सुरुवातीला काही मतदान केंद्रावर चिन्ह अस्पष्ट दिसत असल्याच्या तक्रारी आल्या. तर काही ठिकाणी एकच बटन दाबल्याने मतदान नोंदणी होत नाही अशी ओरड सुरू झाली.
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व सर्वात श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीपासून निरुत्साह दिसून आला. दुपारी १:३० वाजेपर्यंत केवळ ३२:६८ टक्के इतकेच मतदानाची नोंद झाली. तर सर्वाधिक मतदान वडवली शिरडोण येथे ७४:५७ इतके झाले होते. या खालोखाल आणे भिसोळ, ग्रामपंचायतीचे जास्त मतदान झाले होते. दुपारी ३: ३० पर्यंत म्हारळ येथे केवळ ४५:२९ इतके मतदानाची नोंद झाली.तर भिसोळ ७४:४३, बेहरे ५६:४३, खोणी ६४:४३, आपटी ७४:३७, बापसई ६६:४७, गुरवली ७७:२१,गोवेली ६०:३४, घोटसई ६८:४८, कांबा ८१:९१, जांभूळ ६१:८५, नडगाव दांणबाव ६१:००,राया ६२:९८, रायते ६१:३९,म्हसकळ ७८:२४, निंबवली ७५:२०, सांगोडा ७२:०३,उतणे चिंचवली ७८:९४, वडवली शिरडोण ८५: ४३,आणि मानिवली ७३:१९असे एकूण ६०:६० टक्के मतदान झाले होते त्यामुळे शेवटच्या एक ते दीड तासात साधारण पणे ६० ते ६४ टक्के मतदान झाले असल्याचे समजते.
 दरम्यान म्हारळ ग्रामपंचायतीचे कमी मतदान कोणाच्या पथ्यावर व कोणाच्या माथ्यावर पडणार ये निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल असे असले तरी कमी मतदान का झाले याचे म्हारळ वाशियानी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 

*मुरबाड तालुक्यातील जांबुर्डे ग्रामपंचायतीत श्रीमती रखमाबाई पोसू ठोंबरे या ११५ वर्षे वयाच्या आजीने मतदान केले. तर अनूबाई गणपत बिराडे या ९९ वर्षे आजीने मतदान केले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष एकनाथ देसले नितीन घागस, जगदीश पस्टे यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली तर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस बोराडे, उपनिरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी या केंद्राला भेट दिली. 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...