वरप ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश भोईर यांचा ओमसाई बाबानगर रहिवाशांतर्फे सत्कार !!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकमेव बिनविरोध निवड झालेल्या वरप ग्रामपंचायतीचे वार्ड क्रमांक तीन चे सदस्य अंकुश जनार्दन भोईर यांचा गावातील ओमसाई बाबा नगरातील महिला मंडळ, बचतगट आणि रहिवाशांनी त्यांची ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नुकताच जाहीर सत्कार केला.
वरप ग्रामपंचायतीचे हद्दीत ओमसाई बाबा नगर वसले आहे. येथे ४० ते ५० लोकांची घरे आहेत. गेल्या १०ते १५ वर्षांपूर्वी येथे रस्ते, गटारे, दिवाबत्ती याची काही सुविधा नव्हती. कामावरून घरी यायचे म्हणजे चिखल, सांडपाणी, खड्डे, मच्छर, सगळ्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य अशी परिस्थिती होती. तेव्हा हा एरिया वार्ड क्रमांक २ मध्ये येत होता. परंतु या वार्डातून १०/१५ वर्षांपूर्वी अंकुश भोईर व अश्विन भोईर हे तरुण सदस्य निवडून आले आणि त्यांनी ताबडतोब ओमसाई बाबा नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बनवला तसेच गटार बनविले. परंतू यांनतर निवडून आलेल्या सदस्याने या नगरकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आता परत वरप ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि पुन्हा एकदा याच वार्डातून अंकुश भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आमची कामे करणा-या उमेदवारालाच आमचा पाठिंबा अशी भूमिका येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान रामचंद्र चौधरी, पत्रकार संजय कांबळे, जगण गायकवाड, सुरेश चौधरी, गणेश सोनावणे नवनाथ अहिरे आदींनी घेतली.
सुदैवाने वरप ग्रामपंचायतीचे १३ सदस्य बिनविरोध निवडून आले. यामध्ये वार्ड क्रमांक तीन मधून अंकुश जनार्दन भोईर यांचाही समावेश आहे त्यामुळे येथील ओमसाई बाबा नगर मधील ओमसाई समूह बचत गट, महिला मंडळ, आणि रहिवाशी यांनी सदस्य भोईर यांना आमंत्रित करुन त्यांचा जाहीर सत्कार व महिलांचा हळदीसमारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रथम येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी पुष्पहार घालून अंकुश भोईर यांचे स्वागत केले. तर त्यांच्या पत्नी मनिषा अंकुश भोईर व वहिनी आनंदीबाई वासुदेव भोईर यांना हळदी कुंकू लावून बचतगटाच्या अध्यक्षा श्रीमती शितल संजय कांबळे, रेखा भगवान चौधरी, अलका जगण गायकवाड, यांनी औक्षण केले.
यावेळी बचतगटांच्या सचिव श्रीमती कविता पाटील, दिपिका पाटील, सदस्या संगिता चौधरी, पुष्पा गणेश सोनावणे, आशा गायकवाड, सारीखा चौधरी, कविता सुरोशे, संगीता मोहिते, रुपाली ढगे, अनिता पवार, उमाबाई गांवडे, लिलाबाई मोहिते, पूजा चौधरी, वंदनाबाई गायकवाड, राधाबाई लोंढे, आदी उपस्थित होते. यावेळी आपण या परिसराच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कांबळे यांनी केले तर आभार भगवान चौधरी यांनी मानले.या प्रसंगी परिसरातील महिला, बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.


No comments:
Post a Comment