Saturday, 16 January 2021

नाशिक विद्यापीठातून शीतल नलावडे होमिओपॅथिक मेडिकल मध्ये तिसरी !

नाशिक विद्यापीठातून शीतल नलावडे होमिओपॅथिक मेडिकल मध्ये तिसरी !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
        बीएचएमएस अंतिम वर्षाच्या महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत सावरकर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी शीतल जालिंदर नलावडे हि नाशिक विद्यापीठातून तिसरी येत महाराष्ट्रातूनही तिसरी येण्याचा बहुमान संपादन केला असून मेडिकल कॉलेजमध्ये पहिली आली आहे. भांडुप गावच्या शिवाई मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा कवी जालिंदर नलावडे यांची कन्या शीतल नलावडे हिने होमिओपॅथिक आरोग्य विद्यापीठाने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. शीतल हिने भांडुपच्या इंडियन एजुकेशन सोसायटी या शाळेतून माध्यमिक तर एस. के. सोसायटी कॉलेजमधून उच्च माध्यमिक शिक्षण  करून तिने सातारा येथील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तो डॉक्टर होण्याच्या उद्देशाने. शिक्षण पूर्ण करताना तिने वाचनाचा चांद जोपासला. तिच्या यशाबद्दल सावरकर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष अरविंद गवळी, सचिन गवळी, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पालेकर यांनी शीतल हिचे अभिनंदन केले. एच.एम.एस. अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शीतल नलावडे हिच्या यशस्वी कामगिरीबद्दल भांडुप परिसरात तिचे कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...