ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात सत्तर ऐंशी चे दशक गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्याकडून एस के फिल्म च्या कलाकारांना आशिर्वाद !
कल्याण (संजय कांबळे) : हुकमी अभिनय आणि जरबयुक्त आवाजाने संपूर्ण पडदा व्यापणारी चौकस दृष्टी या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात सत्तर ऐंशीचे दशक गाजवणाऱ्या जेष्ठ चरित्र अभिनेते विलास रकटे यांनी नुकतेच एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस च्या टिम कलाकारांना आशिर्वाद दिला व त्यांच्या कामाचे कौतुक केले, हा क्षण संस्थेसाठी परम भाग्याचा असलेल्याची भावना सर्व कलाकारांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्य़ातील कामेरी या गावी विलास रकटे यांचा जन्म झाला. घराणेच क्रातीकारकांचे असल्याने साहजिकच विलास रकटे याला अपवाद कसे काय असणार, यांचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रीसरकार आणि चलेजाव अंदोलनात सक्रिय होते. त्यामुळे देशभक्ती व लढवय्ये वृती रकटे कुंटूबात भिणलेली होती. सध्या वार्धक्य साभांळत अस्सल कलावंताचा पिंड जपला आहे.
एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेचे कलाकार नामदेव बल्लाळ, मोसीन जमादार, रोहित सकटे, सुरेश वाडकर, दयानंद वाघमारे यांनी अष्टपैलू चरित्र अभिनेते विलास रकटे यांची भेट घेतली व चरणस्पर्श केला आणि शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्या हस्ते मराठी गाण्याचे पोस्टरचे उद्घाटन केले. यावेळी चित्रपटाचा विषय निघताच तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते सांगू लागले. घरात राजकारण असल्याने तसेच राजकीय परंपरा असल्याने याच क्षेत्रात भरीव काम करावे अशी सर्वाचीच इच्छा होती. मात्र राजकारणाचा उबग आलेले विलासराव नाटक - चित्रपटांच्या प्रेमापोटी कोल्हापूर गाठले. राजकारणापेक्षा कला मोठी हे माणून रुपेरी पडदा जवळ केला, बंलदड शरीरयष्टी, हुकमी अभिनय, जरबयुक्त आवाजाने पडदा व्यापणारा विलास रकटे प्रेक्षकाच्या पंसतीला उतरले. आई शेतात आहे, येथून सुरुवात केलेल्या विलास रकटे यांनी 'तुमचं आमचं जमलं, चित्रपटात धमाल उडवली,' गनिमी कावा 'या ऐतिहासिक चित्रपटात सुर्यकांत बरोबर च थरारक तलवारबाजी करणारा अस्सल मुगल सरदार साकारला, त्याकाळी मराठी चित्रपटांचा चेहरा पुर्णत :ग्रामीण असल्यामुळे रकटे यांच्या भूमिकांचा बाजसुध्दा ग्रामीण ढंगाचा राहिला होता. 'फुकट चंबू बाबूराव,' चोरावर मोर,, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल ं,
निखारे, चांडाळ चौकडी, लक्ष्मी, सर्वसाक्षी, तांबव्याचा विष्णूबाळा, अंगारकी अशा अनेक यशस्वी चित्रपटात खलनायक रंगवला, सन २०१७ मध्ये इच्चाक चित्रपटातून ते वयाच्या पंच्याहत्तरीत झळकले.
चरीत्र अभिनेता अशी इमेज असलीतरी प्रतिकार, व अन्याय या दोन चित्रपटातून ते नायक म्हणून समोर आले. जयश्री गडकर, रंजना, आशालता, ते अलका कुबल, निशिगंधा वाड, या अभिनेत्री बरोबरच दादा कोंडके, निळू फुले, शरद तळवलकर, डॉ श्रीराम लागू, अशा दिग्गजांच्या बरोबरीने त्यांनी काम केले आहे. वार्धक्य आणि वय शंभरीकडे झुकलेले असले तरी त्यांचा उत्साह तरुणाईला लावणारा असाच होता.
ढिगभर चॅनेल आणि मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट वाजत गाजत प्रदर्शित होतो. या काळात शेकडो कलाकार आले व विस्मरणात गेले. मात्र आपल्या हुकमी अभिनय आणि जरबयुक्त आवाजाने संपूर्ण पडदा व्यापणारा विलास रकटे नावाचा प्रतिभासंपन्न कलाकार अष्टपैलू चरित्र अभिनेते विलास रकटे, ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात सत्तर ऐंशी चे दशक गाजवले. तो रांगडा अभिनेता विलास रकटे हे लाखो, करोडो प्रेक्षकांच्या हद् याच्या कप्प्यात कायमस्वरूपी घर करुन बसलेत.
एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या टिमच्या कलाकारांनी या "चित्रकर्मी" च्या पायांना चरणस्पर्श केला आणि या बलदंड अभिनेत्याकडून "उर्जा" घेऊन याच शिदोरी वर टिमसाठी पुढील प्रवासाला सुरुवात केली.


No comments:
Post a Comment