गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपतर्फे दादर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !!
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) :
शिवसेनाच्या माध्यमातुन आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन एक हात मदतीचा हा महत्वपुर्ण उपक्रम गोरगरिबांसाठी सुरु करुन कोवीड-१९ काळात या समुहाने अनेकांना मदतीचा हात दिला. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या समुहातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहन नुसार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी राजे शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर पुर्व येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रुपतर्फे डोंबिवली येथील जोशी काका यांना २१,०००/- रु.मदत कोरोना काळात करण्यात आली. आता मुंबई मध्ये रक्तपुरवठा कमी असल्या मुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात येत असल्याचे ग्रुपचे पदाधिकारी संस्थापक संतोष पाटील, संचालक सुर्यकांत कडू, अध्यक्ष रविंद्र जाधव, उपाध्यक्ष, यशवंत खोपकर यांनी सांगितले. तरी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अवि राऊत, सेक्रेटरी दिलीप गावड़े, उपसेक्रेटरी वसंत सोनावणे, अनिळ कांबळे खजिनदार, रमेश वागावकर, उपखजिनदार, दत्तात्रेय घुले, महादेव जांबुरले, सल्लागार सुरेश कोरगावकर, संगीत बागकर, विशाल कोलेंकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.कारण रणभूमीवर जाऊन देशासाठी रक्त साडणे प्रत्येकाला शक्य नाही. मात्र तेवढेच पुण्यकार्य सहज शक्य आहे रक्तदान केल्याने मिळू शकते. शिवाय जी लाहान मुले थँलिसिमीया या आजाराने त्रस्त आहेत त्यांना आयुष्यभर दर १५ दिवसांनी रक्त घ्यावे लागते. त्यांना हे रक्त प्राप्त झाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून "रक्तदान...सर्व श्रेष्ठ दान.."रक्तदान करा..जीवन वाचवा.."असा संकल्प करत हे शिबिर आयोजकांतर्फे घेण्यात येत आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करावे असे आवाहन शिवसेनाच्या माध्यमातुन आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment