मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर !! **श्रेयासाठी महा विकास आघाडी " भाजपाचे परस्पर दावे **
मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात शुक्रवार दिनांक 15/01/2021 रोजी झालेल्या निवडणुकीत एकुण 44 ग्रामपंचायतींपैकी निवडणुकीपूर्वी 5 ग्रामपंचायती मध्ये बिनविरोध जागा निवडून आल्या. तर उर्वरित प्रत्यक्षात 39 ग्रामपंचायतीं मध्ये प्रत्यक्षात निवडणुक प्रक्रिया घेण्यात आल्या असून त्यांचा निवडणूक निकाल आज सोमवार 18 /01/2021 रोजी प्रचंड बंदोबस्तात मुरबाड तहसीलदार यांनी घोषित केला. त्यामध्ये शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने 39 पैकी 32 ग्रामपंचायती ह्या आमच्या पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत असा दावा ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार व तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांनी केला आहे. तर सत्ताधारी भाजप पक्षाने 44 ग्रामपंचायतींपैकी 37 ग्रामपंचायती ह्या आमच्याच पक्षाच्या आल्या आहेत.अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव यांनी दिली आहे. परंतु या दोन्ही पक्षाच्या वतीने केलेले दावे-प्रतिदावे हे मात्र सरपंच पदाच्या निवडीनंतर स्पष्ट होतीद. त्यावेळी समजेल कि कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत. परंतु सद्य स्थितीला तरी भाजप व महा विकास आघाडीचे दावे-प्रतिदावे गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे .
महाविकास आघाडी ने दावे केलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
माल्हेड 'खांडपे 'खांदारे 'शेलारी' डेहनोली 'कान्हार्ले ' मासळे ' यांच्यासह 32 तर
भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
असुन नारीवली 'देवपेे' शिवळे' आगाशी 'उचले यांच्यासह 37 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
निवडणूक आयोगाने राखून ठेवलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत हवी तेवढी चुरस दिसून आली नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांना अंदाज बांधणे आणि दावे करणे अवघड झाल्याचे चित्र यंदा पहिल्यांदाच दिसून आले आहे.



No comments:
Post a Comment