Monday, 18 January 2021

कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीपैकी अकरा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व सर्वात मोठी ग्रामपंचायत आघाडीकडे !!.

कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीपैकी अकरा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व सर्वात मोठी ग्रामपंचायत आघाडीकडे !!


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या निवडणूक मतमोजणीच्या निकालात भाजपाने जोरदार मुसंडी मारत ११ ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पुरेसे सदस्य निवडून आले आहेत तर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या बेहरे ग्रामपंचायत आघाडीकडे राखण्यात यश आले असून दुसरी म्हारळ त्रिशंकू अवस्थेत आहे. 


यावेळी मनसेने देखील आपले खाते उघडले आहे.
तालुक्यातील वरप ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाली होती उर्वरित राहिलेल्या २० ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत तालुक्यातील २०पैकी १ १ग्रामपंचायतीत भाजपाच्या बाजूने निकाल लागला आहे. यामध्ये गोवेली, म्हसकळ, निंबवली, गुरवली, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री नडगाव, सांगोडा आदी ग्रामपंचायतीचा समावेश असून तालुक्यातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेल्या खडवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना काँग्रेस आघाडीने सत्ता मिळवली आहे तर म्हारळ ग्रामपंचायत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. येथे भाजपा ७,शिवसेना ७व इतर ३असे पक्षीय बलाबल आहे.


तर तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांबा ग्रामपंचायतीवर भगवा पळविण्यात येथे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता भोईर यांना यश आले आहे. याच प्रमाणे वडवली, रायते, मानवली, येथे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे येथे मनसेचे ४,भाजपा २,आणि शिवसेना ५असे पक्षीय बलाबल आहे. तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. असे असले तरी सरपंच पदाचे आरक्षण पडल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात हे चित्र स्पष्ट होईल एकूणच सर्व २१ ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा विचार केला तर तालुक्यात भाजपाच मोठा पक्ष ठरणार आहे असे वाटते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...