Monday, 18 January 2021

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन संपन्न !

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार, दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
       32 वे रस्ता सुरक्षा अभियान दि.18 जानेवारी ते  17 फेब्रुवारी  2021 या कालावधीत राबविले जाणार असून "सडक सुरक्षा-जीवन रक्षा" हे याचे घोषवाक्य आहे. 
     यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...