'वनविभाचे दुर्लक्ष' !
मुरबाड-प्रतिनिधी (मंगल डोंगरे) : "झाडे लावा झाडे जगवा" या उक्तींचा जणू विसर मुरबाड वनविभागाला पडलेला दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड शहरालगत वनविभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन बागेश्वरी आॕक्सिजन पार्क उभारण्यात आले आहे. भविष्यात हे पार्क पर्यटकांना आकर्षित करेल असे मुरबाड वनविभागा कडून सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी लागवड केलेल्या विवीध प्रकारच्या झाडांना पाण्याअभावी करपून जाण्याची वेळ आली आहे. या आॕक्सिजन पार्कला लागूनच बागेश्वरी तलाव आहे या तलावातून झाडांना पाणी देण्यासाठी पाईप लाईन सूद्धा टाकली आहे. परंतु पाणी उशाला कोरड घशाला अशी अवस्था या झाडांची झाली आहे पाण्याअभावी झाडे कोरडी शुष्क पडली आहेत वनविभागाने लाखो रुपये यासाठी खर्च केले आहेत तर मग या झाडांची काळजी सूद्धा घेतली पाहिजे असे येथे येणारे नागरिक सांगत आहेत.
*** झाडांना पाणी देण्यासाठी माणूस नसल्याने लवकरच याबाबत त्यासाठी नियोजन करुन निधी मंजुर केला जाईल ** विकास भामरे ,वनपरिक्षेञ अधिकारी मुरबाड पूर्व


No comments:
Post a Comment