सुमंगल क्लीनिकल लॅब व गर्जा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निम्मित मोफत मधुमेह तपासणी शिबीर संपन्न !!
मुरबाड, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निम्मिताने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. व विविध कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली जाते. त्याच अनुषंगाने शिवजयंती निम्मित मुरबाड मध्ये **सुमंगल क्लीनिकल लॅब व गर्जा प्रतिष्ठान ** च्या माध्यामातून मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. दत्तात्रय बोराडे साहेब, व जेष्ठ पत्रकार मंगलजी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा लाभ असंख्य मुरबाडकरांनी घेतला. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुमंगल लॅब चे संचालक अजिंक्य डोंगरे, गर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितेश डोंगरे यांच्यासह संतोष भांडे, सचिन थोरात, प्रथमेश रोठे, वैजयंता डोंगरे, दर्शना बांगारा, रोशन देसले, रुपेश खाटेघरे ,योगेश शहा यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. तर अशा पद्धतीने शिवजयंती साजरी केल्या बद्दल **सुमंगल क्लीनिकल लॅब व गर्जा प्रतिष्ठानचे** मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment