गर्जा प्रतिष्ठाने केला शिवजयंती निमित्त दीपोत्सव साजरा !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निम्मिताने गर्जा प्रतिष्टान च्या माध्यमातून मुरबाड शहरात दिपोत्सव व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा आपल्या साठी कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. याच अनुषंगाने गर्जा प्रतिष्ठानने घराघरात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन गोड्याचा पाडा या मुरबाड मधील गावामध्ये केले होते. त्यास संपूर्ण गावातील रहिवाश्यांच्या उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गर्जा प्रतिष्ठानने संपूर्ण गावभर १००० दिवे लावून शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. संपूर्ण गावातील भगिनींच्या हातातून दिवे लावून हा कार्यक्रम साजरा केला गेला .
त्याच बरोबर आम्हाला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रोशन अनिल देसले याना प्रथम क्रमांक, धीरज कोंगेरे द्वीतीय क्रमांक तर संदीप कापडी यानी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
No comments:
Post a Comment