मुख्यमंत्र्यांच्या विकेल ते पिकेल या महत्वकांक्षी योजने अंतर्गत माणगांव कृषी अधिकारी मार्फत दहिवली कोंड येथे भाजीपाला विक्री केंद्र सुरू !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : बुधवार दिनांक १७/३/२०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या मौजे दहिवली कोंड येथे तालुका कृषी अधिकारी माणगाव यांचे कडून मा. मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी विकेल ते पिकेल योजने अंतर्गत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात आले.
सदर भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील दहिवली कोंड परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणारा भाजीपाला या ठिकाणी शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळेल व शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे. श्रीमती ऊर्मिला लक्ष्मण शिंदे या ग्राहकांना थेट भाजीपाला विक्री करणार आहेत. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री.रविंद्र पवार, मंडळ कृषी अधिकारी श्री.किरण पडवळकर, कृषी सहाय्यक श्रीमती रोहिणी सागर,श्री.अमोल गावडे, गावातील श्री.राजेंद्र काळोखे, श्री.नवनीत सत्वे व महिला इत्यादिंची उपस्थिती लाभली होती.

No comments:
Post a Comment