Wednesday, 3 March 2021

कल्याण ग्रामीण भागात कोरोना गर्दीत चिंगरुन मरणार, लोक करताहेत मज्जाच मज्जा, कोरोना उडवणार फज्जाच?

कल्याण ग्रामीण भागात कोरोना गर्दीत चिंगरुन मरणार, लोक करताहेत मज्जाच मज्जा, कोरोना उडवणार फज्जाच?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिसरात दररोज शेकडो कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात देखील रोज ४ ते ५ पेशंट सापडत आहेत. तरीही आपल्या भागात कोरोना नाही अशा अविर्भावात ग्रामीण भागातील लोक वावरत असून इकडे कुठे पोलीस, प्रशासन, आरोग्य विभाग आहे असे काही दिसत नाही. त्यामुळे या दिवसेंदिवस वाढणा-या गर्दीत कोरोना चिंगरुन मरणार असे उपहासाने म्हणावे लागते.


गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे लोक हैराण झाले आहेत. यामध्ये कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलिस, डॉक्टर असा अनेकांचा समावेश होता. आतापर्यंत १३१ लोकांचा जीव गेला आहे. तर १२५४ पेंशट असून अजूनही ११५४ रुग्ण हे अॅक्टीव आहेत तर सुमारे १९ हजार १७६ हे पेशंट हायरिस्क आहेत.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की अजूनही कल्याण तालुक्यातून कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. त्यातच आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र, दहागाव केंद्र, आणि खडवली केंद्राच्या हद्दीत रोज ४/५ पेंशट आढळून येत आहेत. महाराष्ट्रातील अकोले, यवतमाळ, नागपूर, अमरावती बीड, जालना आदी जिल्हे कोरोनाचे हाॅस्पाॅट झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊन नको असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि सोशलडिंस्टग असे नियम पाळावे लागतील असे सांगितले होते.
परंतु कल्याण ग्रामीण भागात मात्र याला जनतेने हरताळ फासला आहे. ना  मास्क, ना सॅनिटायझर, ना सुरक्षित अंतर त्यामुळे म्हारळ, गोवेली, मामणोली येथील आठवडे बाजारात हे चित्र प्रकर्षांने दिसून आले. गोवेली येथे तर पोलीस चौकीचे मागेच बाजार भरतो. त्यामुळे येथे ना आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ना पोलीस, ना प्रशासन, लोक करताहेत मज्जाच मज्जा पण अशीच परिस्थिती राहिली तर मात्र कोरोना यांचा उडवणार फज्जाच फज्जा ऐवढे नक्की, म्हणून आताच सुधारणा झाली पाहिजे, नाहीतर 'मी जबाबदार' हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा खरा ठरेल हे लक्षात असूद्या. 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...