Tuesday, 6 April 2021

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडून एस के फिल्म च्या कलाकारांचा केला सन्मान व दिल्या शुभेच्छा!

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडून एस के फिल्म च्या कलाकारांचा केला सन्मान व दिल्या शुभेच्छा!


कल्याण, (संजय कांबळे) : जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था रजि संचलित एस के फिल्म प्रोडक्शन चा बालकलाकार कु हिंमाशू संजय कांबळे व सह कलाकारांचा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यथोचित सन्मान केला व पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा दिल्या.


जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था या महाराष्ट्र शासन नोंदणीकृत पत्रकार संघटनेने पत्रकारितेचे सामाजिक भान जपत अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, कष्टकरी मोलमजुरी करणा-याना धान्य वाटप, याबरोबरच आरोग्य सेवा, खाजगी शासकीय मदत, आदी ऐनतेन प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे. याचा समावेश असून हे करित असताना परिसरातील नवोदित कलाकारांना संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे यांनी एस के फिल्म प्रोडक्शन या नावाची एक संस्था स्थापन करून या योगे कलाकारांना त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले
आतापर्यंत मराठी हिंदी चित्रपट, नाटक क्षेत्रातील दिग्गजांनी संस्थेला मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. यामध्ये जेष्ठ चित्रपट अभिनेते प्रशांत दामले, जयवंत वाडकर, लावणी क्वीन विजया पालव, सध्याचे आघाडीचे अभिनेते सागर कांरडे, उमेश जगताप, प्रणव रावराणे, श्री गठणे, अभिनेत्री इरावती लागू, आदी कित्येक कलाकारांचा समावेश आहे.
एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस च्या कलाकारांनी अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली असून याची दखल घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ अभिनेते विलास रकटे, भाजपाचे उपाध्यक्ष तथा कार्यसम्राट आमदार किसन कथोरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, कल्याण तहसीलदार दिपक आकडे, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, अशा अनेक अधिकारी, कर्मचारी व मंडळे यांनी कलाकारांना गौरविले असून कौतुक केले आहे.
अशातच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार तथा टिम प्रमुख संजय कांबळे यांना कोरोनाच्या अंत्यत बिकट परिस्थितीत अमुल वेळ देऊन एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस च्या प्रोजेक्ट पोस्टरचे अनावरण केले. यावेळी टिमचा बालकलाकार हिंमाशू कांबळे याचा विशेष गौरव व कौतुक करुन सहकलाकार कु गौरी पाटील, कु रुकसाना शेख, कु तेजेश शिसवे, वंसत शिसवे तसेच एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे टिम प्रमुख तथा पत्रकार संजय कांबळे यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी संस्थेच्या पुढील प्रोजेक्ट ची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आस्थेने विचारपूस करुन आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन भविष्यातील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित....

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित.... **भाजप मधुन मनोज पाटील राजु ढगे यांची नावे आघाडीवर.. ...