संतोष अबगुल प्रतिष्ठानची नालासोपारा येथे पुन्हा एकदा ५०३ रक्तदात्यांकडून रक्तदान !!
नालासोपारा, (शांत्ताराम गुडेकर / दीपक मांडवकर) :
संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून नालासोपारा येथे रविवारी ४ एप्रिल २०२१ रोजी पुन्हा एकदा ५०३ रक्तदात्यांनी रक्त देऊन ऐतिहासीक रक्तदान शिबीरची नोंद केली.
रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान, रक्तदान हेच जीवनदान मानले जात असताना आताच्या काळात प्रत्येक रुग्णालयात रक्तचा तुटवढा भासत आहे.
विविध संस्था रक्तदान शिबिरचे उपक्रम राबवत असून देखील ही रक्तदानाची समस्या दिवसांन दिवस वाढत आहे. अशातच संतोष अबगुल प्रतिष्ठांचे संस्थापक श्री. संतोष अबगुल यांच्या माध्यमातून दर वर्षी विविध सामाजिक व वैद्यकीय मोफत विविध उपचार उपक्रम राबवत असताना सामाजिक बांधिलकी व नागरिकांना आपुलकीचे नाते जोडले जात आहे. (जेथे समस्या तेथे संतोष अबगुल प्रतिष्ठान) अशी प्रतिमा जनतेने आपल्या मनात उतरवली असल्याचे आजच्या रक्तदान योदनाने प्रदर्शित झाले. रविवारी सकाळ पासूनच आशीर्वाद हॉल, जाधव रसिडेंशी विजय नगर, नालासोपारा पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराने प्रामुख्याने सर्व सभासदांना इछुक नागरिकांनी देखील सहभाग घेतला या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ७ वाजता झाला तर श्री संतोष दादा अगबुल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना काळात रक्त उपलब्ध होत नाही म्हणून रुग्णाच्या नातरवाईकांची तारांबळ होते. हे पाहून व त्याची उणीव भासू नये म्हणून संस्थापक श्री संतोष अबगुल यांच्या माध्यमातून संतोष अबगुल प्रतिष्टान दापोली- मंडनगड-खेड व रत्नागिरी जिल्ह्या विभाग वसई नालासोपारा व विरारच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिरा करण्यात आले.
या प्रतिष्ठान च्या सहयोगात महात्मा गांधी सेवा मंदिर हॉस्पिटल ब्लड बँक नवी मुंबई, साथीया ब्लड बँक, नवी मुंबई ब्लड बँक यांनी सहयोग दिला. या शिबिरात प्रमुख्याने सात ते आठ तालुक्यातील रक्तदातांनी सहभाग घेतला. त्यात महिलानी सुद्धा उसूक्त पणे सहयोग दिला. संतोष अगबुल प्रतिष्ठान हे केवळ प्रतिष्ठान नसून आपच्या परिवाराचा हिस्सा असल्याचे संस्थापक श्री. संतोष अगबुल यांनी मनोगत वेक्त केले. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा न्युतन विद्यालय येथे ३६९ रक्त दाता लाभले होते. आणि आता तोच स्वतःचा रेकॉर्ड मोडीत कडीत रविवारी ४ एप्रिल ला ५०३ असा ईतिहास नालासोपारा परिसरात पुन्हा या प्रतिष्ठानने केल्याचे संबोधले जाते आहे.विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येक वेक्ती व रक्त दाताला प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संतोष अगबुलयांनी स्वःता वयक्तिक आभार मानले. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी कोनाहीती मदत लागल्यास मी सदैव आपल्या सेवे साठी हजर राहण्याची ग्वाही दिली.



No comments:
Post a Comment