Wednesday, 7 April 2021

कल्याण पंचायत समिती शिवसेनेच्या उपसभापतीवर सेनेच्याच सदस्यांचा अविश्वास, तालुकाप्रमुख व उप जिल्हा प्रमुखावर रोष?

कल्याण पंचायत समिती शिवसेनेच्या उपसभापतीवर सेनेच्याच सदस्यांचा अविश्वास, तालुकाप्रमुख व उप जिल्हा प्रमुखावर रोष? 



कल्याण (संजय कांबळे) : दिलेला शब्द न पाळल्याने अखेर शिवसेनेच्या एका गटाने भाजपाशी हातमिळवणी करून व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या मदतीने कल्याण पंचायत समितीच्या शिवसेनेचे उपसभापती रमेश भाऊ बांगर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला.
 
असून या पत्रावर एकूण १२ सदस्यांपैकी १० सदस्यांच्या सह्या असून हे पत्र जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे देण्यात आले असून त्यांनीही पत्र मिळाल्याचे मान्य केले आहे. तर हा सर्व प्रकार आपण तालुकाप्रमुख वंसत लोणे व उप जिल्हाप्रमुख ग्रामीण सदाशिव सासे यांनी दिलेला शब्द न पाळल्याने केला असल्याचे उपसभापती पदाचे दावेदार उमेदवार सेनेचे किरण ठोंबरे यांनी सांगितले
कल्याण पंचायत समिवर शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाचे ५, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे पक्षीय बलाबल असून शिवसेनेच्या अनिता वाकचौरे सभापती तर उपसभापती पदी रमेश बांगर यांची निवड झाली होती. परंतु या निवडणुकीच्या वेळी २७ गावाकडिल सदस्य किरण ठोंबरे व भरत भोईर यांनी मोठा राडा केला होता. त्यांचे म्हणणे होते की सभापती पद कल्याण पश्चिम मेला दिले तर उपसभापती पद हे पुर्वेला द्या, तसे बैठकीत ठरले होते, इतकेच नव्हे तर तसा शब्द शिवसेनेच्या कल्याण तालुका प्रमुख वंसत लोणे व उपजिल्हा प्रमुख ग्रामीण सदाशिव सासे यांनी शब्द दिला होता. पण यांनी शब्द पाळला नाही.
याहूनही पुढे उपसभापती रमेश बांगर हे पुढील ३ महिण्यात राजीनामा देतील. तुम्ही शांत रहा असा सल्ला ही दिला होता. असे सदस्य किरण ठोंबरे यांनी सांगितले पण तसे झाले नाही, अखेर यांना धडा शिकवण्यासाठी मी भाजपाचे ५ सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडे एकुण १२ सदस्यांपैकी १० सदस्यांच्या सह्यांची पत्र दिले आहे. यावर किरण ठोंबरे, भरत भोईर, रेश्मा भोईर, अस्मिता जाधव, रंजना देशमुख, यशवंत दळवी, पांडुरंग म्हात्रे, दर्शना जाधव, भारती टेंभे आणि भरत गोंधळे अशा १० सदस्यांनी सह्या केल्या असून इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करने, पदाचा गैरपयोग करने, कामात हलगर्जीपणा करने अशी कारणे नमूद केली आहेत.
असे असले तरी उपसभापती रमेश बांगर हे पदावर बसल्यापासून शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख वंसत लोणे व उपजिल्हाप्रमुख ग्रामीण सदाशिव सासे यांच्या विरोधातील आग सदस्य किरण ठोंबरे यांच्यात धगधगत होतीच. कारण शब्द देऊन तो न पाळल्याचा राग ठोंबरे यांना आला होता. व तोच त्यांनी कृतीत उतरवला! त्यामुळे उपसभापती पदी सेनेचे किरण ठोंबरे यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते. 

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...