Sunday, 2 May 2021

नवी मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयात आय.सी.यु मध्ये सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवा : शोभाताई भोईर

नवी मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयात आय.सी.यु मध्ये सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवा :  शोभाताई भोईर


नवी मुंबई - येथील परिसरातील सर्व कोव्हीड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी दुर्गा फाऊंडेशन च्या वतीने नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.


नवीमुबंई शहरात कोव्हीड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील शेकडो रुग्ण आय सी यु व व्हेटिलेटरवर उपचार घेत आहेत. रुग्ण आय सी यु त पोचल्यानंतर त्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला पाहता येत नाही.रुग्णांचे नातेवाईक आय सी यु कक्षाच्या बाहेर दिवस-रात्र काळजीत बसलेले असतात.बऱ्याचदा आय सी यु दाखल झालेले रुग्ण हे कालांतराने मृत पावत असल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.डॉक्टरांकडून आपल्या रुग्णावर उपचार होताना नातेवाईकांना पहाता यावे व आपल्या रुगणाचे नक्की काय झाले यासाठी आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे दुर्गा फाउंडेशन ने केलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे

कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन देखील घेता येत नाही हे अत्यंत वेदनादायी व दुःखद घटना आहे. त्यामुळे निदान आय.सी .यु कक्षात सी सी टी व्ही कॅमेरे लावुन तो डीस्पले रुग्णालयातील आवारात लावल्यास नातेवाईकांनाआपल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येईल,जीवाला लागलेला घोर कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी भावना दुर्गा फाऊंडेशनची असून यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ शोभाताई भोईर,नवी मुंबई अध्यक्षा सौ हेमलता खंदारे, नवी मुंबई सचिव सौ.रसिका म्हाञे व संघटक सौ प्रिती जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होत्या .

No comments:

Post a Comment

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा, इंदवी तुळपुळे यांचे प्रशंसोद्गार !

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा, इंदवी तुळपुळे यांचे प्रशंसोद्गार ! ठाणे, दि. ३०, ठाण्या...