महाराष्ट्र दिनानिमित जय महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार संघटनेची बांद्रा येथे स्थापना !
राज्याचे 'परिवहन मंत्री अँड. अनिल परब' यांच्या मार्गदर्शनाने 'माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर', 'संस्थापक कुणाल सरमळकर', 'शाखाप्रमुख संदीप शिवलकर' यांचे सलमान कुरेशी यांना लाभले मार्गदर्शन
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
आज १ मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र मिळाले त्याप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा १ मे १९६० रोजी प्राप्त झाला. आणि तेव्हापासून या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि योगायोग म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिन (Labour Day) सुध्दा असतो आणि तो सुध्दा याच दिवशी साजरा करण्यात येतो. १ मे हा जगातील कामगारांच्या निर्धाराचा व ऐक्याचा दिवस पाळला जातो. १ मे जगातील कामगारांसाठी मोठा स्फूर्तिदायक दिवस आहे. या दिवशी शिकोगो मधील कामगारांनी दिलेल्या आहुती मुळेच जगातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क प्राप्त झाले आहेत. आज खाजगीकरण व अन्य आर्थिक धोरणामुळे कामगार शक्तीला दडपण्याचा घाट मालक वर्गाबरोबर देशयातील सत्याधिश वर्ग करीत आहे.जागतिकीकरण, जागतिक मंदी, स्वेच्छा निवृत्ती कामगार कपात, इ. मुळे कामगार देशोधडीला लागला आहे. त्याचा वाली कोणीही नाही. अशी दयनीय अवस्था कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांसाठी नवा कंत्राटी कायदा आणला आहे. ठरकेदारी कायदेशीर करण्यात असली आहे. त्यामुळे लाखो कामगारांचा उदर निर्वाह, राहणी मानाचा प्रश्न उभा आहे.काम करून घ्यायचे व नंतर त्यांना कामावरून कमी करायचे असा शॉर्टकट मालक वर्गाला सापडला आहे. कामगार दिनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा.महाष्ट्रामध्ये हा दिवस गणतंत्र दिवस किवां स्वतंत्रता दिवसा सारखा झेंडा फडकावून साजरा केला जातो त्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्या मध्ये महाराष्ट्रावर भाषण, निबंध, कविता या सारख्या प्रतियोगिताही होत असतात. मात्र सद्यस्थितीत असलेल्या लाँकडाऊनचे सर्व नियम पाळत मुंबईतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी बांद्रा येथे सलमान कुरेशी यांनी मात्र राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाने माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, संस्थापक कुणाल सरमळकर, शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्या सहकार्याने जय महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार संघटनेची स्थापना आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमिताने संस्थापक कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते केली.युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे मत सलमान कुरेशी यांनी बोलताना व्यक्त केले.
No comments:
Post a Comment