Sunday, 2 May 2021

लसीकरणासाठी पोलिसांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे !! "सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील" यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं.

लसीकरणासाठी पोलिसांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे !!

"सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील" यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं.


*केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. करणार याचा पाठपुरावा - संदिप कसालकर* 

मुंबई, विशेष प्रतिनिधी : जोगेश्वरी व मेघवाडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील या लसीकरणासाठी आपल्या दोन मुलांना कूपर रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसलीही दाद न देता सुजाता पाटील यांना परत पाठवल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलात निराशा झाली असून पोलिसांच्या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

सुजाता पाटील यांनी त्यांच्या पात्रता म्हटलं आहे की, "महाराष्ट्र शासन व सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उद्धवजी ठाकरे सर. जयहिंद सर, माझी आदरणीय महोदय आपणास विनंती आहे, 18 ते 44, वयोगटातील व्यक्तींना आज पासून कोरोना लसीकरण देणे चालू झालेले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र ड्युटी करून रोड वर काम करत आहेत. या कोरोना महामारीमध्ये आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील बरेच पोलीस बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत. श्रद्धांजल्या वाहत वाहत डोळ्यातील पाणी आटून गेलेल आहे., कधी कोणाला कोरोना प्रार्दुभाव होईल याची गॅरंटी नाही. आपणास हात जोडून विनंती आहे, पोलिसांच्या मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा जास्त धोका आहे. हाय रिस्क मध्ये आमचे कुटुंबीय वावरत आहेत. तरी, पोलिसांच्या मुलांना प्राधान्याने कोरोना लसीकरण होणेबाबत त्वरित निर्णय व्हावा. आज स्वतः मी माझ्या 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील दोन मुलांना घेऊन जुहू मुंबई येथील कूपर रुग्णालयात गेली असता मला, येथील वैद्यकीय अधिकारी यांनी जुमानले नाही. रजिस्ट्रेशन कोटा पुरा झालेला आहे, तुम्हाला वरून कोणाचा तरी फोन आणावा लागेल म्हणून सांगितले परंतु वरून कोणाचा फोन आणला पाहिजे त्यांचे नाव सांगा अशी विचारणा केली असता त्या वैद्यकीय अधिकारी यांनी कोणाचा नंबर नाव देण्यास नकार दिला. मी स्वतः सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून मुंबई मध्ये काम करत असताना युनिफॉर्म वर माझ्या दोन मुलांना घेऊन नोंदणी करून वॅक्सीन देण्यासाठी गेली असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी काहीही ऐकून न घेता दाद दिली नाही, मुलांना वॅक्सीन न देता नाराज होऊन घरी परत घेऊन आले. माझ्या मुलांचे चेहरे केविलवाणे झाले. लॉकडाऊन घरी बसून आराम करणारी लोक लसीकरण घेऊन तंदुरुस्त आणि फ्रंट वॉरियर यांची मुलं लसीकरणापासून वंचित, आज प्राप्त माहितीनुसार आठ ते दहा दिवसा पर्यंतची नोंदणी कोटा पुरा झालेला आहे. आमच्या मुलांना काय सुरक्षा आहे ? या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोना सुरक्षिततेची काय गॅरंटी मिळू शकते ? महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा या कोरोना महामारीत युनिफॉर्ममध्ये कर्तव्य करत असताना, आतून आक्रंदत असतो, तो नोकरी व कुटुंब या कचाट्यात पिळवटून निघालेला आहे, त्यांचे मनोधैर्य, आत्मबल वाढवण्यासाठी आपण सन्माननिय विद्यमान  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे सर, आमची तसेच आमच्या कुटुंबीयांची  दखल घ्यावी. हात जोडून विनंती."
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ यावर योग्य ते पाऊल उचलून पोलिसांच्या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे असे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम !

सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम ! ** सावित्रीच्या वेषात हातात फलक घेत मुलींनी दिला नारा  घाटकोपर, (केतन भोज) : क्र...