राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित तर ६६९ रुग्णांचा मृत्यू!
मुंबई : राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शइवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा कालावधी देखील १५ मे पर्यंत वाढवला गेला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६६९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल आहे. राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.
तर, आज ५१ हजार ३५६ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८४.३१ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६८,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
No comments:
Post a Comment