Thursday, 20 May 2021

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!

महाराष्ट्रात दिलासादायक चित्र; रुग्णसंख्येत घट ! बरे होण्याचे प्रमाण अधिक !!


मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आजच्या आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 29 हजार 911 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 47 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 83 हजार 253 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 738 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.55 टक्के एवढा आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 85 हजार 355 एवढी झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख 26 हजार 308 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...