राज्यात दिवसभरात ५४ हजार ०२२ नवे रुग्ण; तर बरे होण्याचे प्रमाण ८५.३६ टक्के !
मुंबई : राज्यात आज 54 हजार 022 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 37 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 42,65,326 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6,54,788 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.36% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात लवकरच पीडियाट्रिक टास्क फोर्स….
तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेचा परिणाम लहान मुलांवरही होऊ शकेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे संकट येण्याआधीच त्याची तीव्रता वाढू नये म्हणून पीडियाट्रिक टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे.
या टास्क फोर्सच्या माध्यमातून लहान मुलांसाठी योग्य नियोजन करण्यात येईल. त्यासाठी बेड, ऑक्सिजन, आयसीयू वॉर्ड अशा सर्व सुविधांच्या उपलब्धतेबाबत विचार केला जात आहे. अनेक बालरोग तज्ज्ञ आणि पीडियाट्रिक डॉक्टरांशी चर्चा केली जात आहे, अशी माहिती देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment