अखेर कल्याण तालुक्यात पाच दिवसांचा कडक लाॅकडाऊण, अत्यावश्यक सेवा देखील बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा भंयकर प्रादुर्भाव होऊ लागला असून तो रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत कल्याण तालुक्यात ५ दिवसांचा कडक लाॅकडाऊण लावण्यांचा प्रस्ताव कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला होता. याला मान्यता देण्यात आली असून कल्याण तालुक्यात सोमवार ते शुक्रवार असा लाॅकडाऊण असणार आहे. यावेळी केवळ मेडिकल व वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. इतर कोणत्याही आस्थापना सुरू ठेवण्यास मज्जाव केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका, भिवंडी पालिका, उल्हासनगर पालिका अशा शेजारच्या शहरातील कोरोना रुग्ण काही प्रमाणात कमी किंवा स्थिर झाले असताना आता कोरोनाच्या दुसर्या लाटेचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. तालुक्यातील म्हारळ वरप कांबा, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री नडगाव, म्हसकळ, अनखरपाडा, चौरे, भिसोळ, खडवली, वालकस, गुरवली पाडा, जांभूळ, खोणी, वडवली शिरढोण, फळेगाव गेरसे कोसले, अशी बहुतेक गावे कोरोना ने गाठली. अगदीच जवळची मित्र, नातेवाईक मरण पावले, सध्या तालुक्यात १४७६ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ३४ प्रतिबंधक क्षेत्र आहेत.
कल्याण तहसील कार्यालयातील तसेच कल्याण पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक, पाणी पुरवठा, आदी विभागातील कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. काही दगावले आहेत. कोणाचे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगी, जावई, यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही पत्रकार देखील कोरोनाचे बळी गेले आहेत.
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही देखील अनेक रिकामटेकडे बाहेर फिरत आहेत. नदीच्या पात्रात, हातगाडीजवळ, रस्त्यावर एकत्र दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यात संचारबंदी आहे का हा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी लोक मोठय़ा प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे.
कल्याण तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी कल्याण तालुक्यात सोमवार दि १० /५/२०२१ ते शुक्रवार ता १४ /५/२०२१असा ५ दिवसांचा कडक लाॅकडाऊण लागू करण्यात आला आहे. यामध्ये मेडिकल वगळता सर्व अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला, बेकरी दुकाने, चिकण /मटन /मासे /फळाची दुकाने, कृषी दुकाने बंद राहतील. केवळ घरपोच दुध सेवा सुरू राहील असा प्रस्ताव कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला. याला जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजुरी दिली. त्यामुळे आता कल्याण तालुक्यात पाच दिवसांचा कडक लाॅकडाऊण लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीच्या वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी दिल्या आहेत तसेच तश्या स्पष्ट सूचना कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना दिल्या असल्याचे तहसीलदार दिपक आकडे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment