Sunday, 9 May 2021

महाराष्ट्र सरंक्षण संघटना संलग्न मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत) तर्फे सुनिल ग. करंबेळे यांची "संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख" पदी नियुक्ती !

महाराष्ट्र सरंक्षण संघटना संलग्न मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत) तर्फे सुनिल ग. करंबेळे यांची "संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख" पदी नियुक्ती !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
   रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु.पो. कासारकोळवण गावचे मुळ रहिवासी नोकरीनिमित मुंबई येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनिल ग. करंबेळे यांची मराठी भाषा जतन व संवर्धन, मराठी संस्कृती संरक्षण व मराठी लोकांच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र सरंक्षण संघटना संलग्न मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत) तर्फे "संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख" पदी कार्याध्यक्ष सन्मा. धर्मेंद्र चं.घाग, कोषाध्यक्ष श्री.अमोल रणदिवे, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. अजित गोरुले आणि प्रतिनिधी चेतन कोलगे  यांनी नियुक्तीपत्र व पुष्पकरंडक देऊन सन्मानपूर्वक नियुक्ती केली. मराठी भाषेवर होणारा अन्याय मराठी भाषेची होणारी गळचेपी यावर रोखठोक बुलंद आवाज आणि कोणत्याही मराठी द्वेषीवर आघात करणाऱ्या सुनिल ग. करंबेळे यांचा हा गौरव आहे. करंबेळे यांचा जनसंपर्क दांडगा असून कोकणासह मुंबईतील अनेक क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत आहेत. कोकणातील जनतेला भेडसावणा-या अनेक समस्यांचा पाठपुरावा ते सातत्याने करत आहेत. संघटनेच्या संस्थापक, अध्यक्ष, पदाधिकारी यांनी करंबेळे यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडून त्या पदाचा मान राखत संघटना वाढीस नक्कीच सहकार्य करतील. सुनिल करंबेळे यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक क्रिकेट संघ, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, मंडळ, संघ, प्रतिष्ठान व समाज बांधवांकडून त्यांना अभिनंदनासह पुढील वाढचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघटनेची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन असे आश्वासन श्री. सुनील ग. करंबेळे यांनी नियुक्तीपत्र स्विकारताना दिले.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...