Sunday, 9 May 2021

कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या दोन हजार डॉक्टरांच्या पोटापाण्याची काळजी टाटा समूहाने घेतली !

कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या दोन हजार डॉक्टरांच्या पोटापाण्याची काळजी टाटा समूहाने घेतली !


नवी मुंबई :  नवी मुंबई शहरात महापालिकेच्या सुमारे १४ कोरोना सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या दोन हजार डॉक्टरांच्या पोटापाण्याची काळजी टाटा समूहाने घेतली आहे. या डॉक्टरांना टाटा समूहाच्या ताज हॉटेलमधून दररोज दोनवेळचे जेवण देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.
आपल्या जीवावर उदार होऊन नवी मुंबई शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये काम करणार्‍या सुमारे दोन हजार डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जेवणाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी यासाठी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे टाटा समूहाच्या ताज हॉटेल नवी मुंबईतील दोन हजार डॉक्टरांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...