Friday, 7 May 2021

एम एम आर डी ए चे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई थांबली, फक्त दोनच इमारती जमीन दोस्त, बाकीच्यां वाचल्या !

एम एम आर डी ए चे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई थांबली, फक्त दोनच इमारती जमीन दोस्त,
बाकीच्यां वाचल्या !


अरुण पाटील, भिवंडी :
        भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असून त्या पैकी एम एम आर डी ए प्रशासनाने 3 मे 2021रोजी मोठया फौज फाट्यासह अनधिकृत इमारती निष्कासित करण्याचे कामाला सुरवात केली. मात्र तीन दिवसात म्हणजे 6 मे 2021 पर्यंत फक्त सात इमारतीवर कराव्या करण्यात आल्या व त्यात फक्त दोनच इमारती निष्कासित करून पाच इमारतींनच्या फक्त भिंती व खिडक्या तोडून थातुर मातुर कारवाया केल्या आहेत. त्यामुळे  काही दिवसात त्या पुन्हा डागडूगी करून चढ्या भावाने विकल्या जातील. या ठिकाणी तीन  दिवसात 10 इमारतींवर कारवाया होणार असल्याचे तेथील स्थानिकांकडून बोलले जात होते. मात्र तसे न झाल्याने सदर इमारती वाचल्या का? वाचवल्या या बाबत एम एम आर डी ए विरोधात चर्चेला उधाण आले आहे.
           सविस्तर हकीगत अशी कि, काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पद्मावती बिल्डर्सचे श्री. मालक रसिक शहा (कल्याणजी) यांनी आमच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे बांधकाम केल्या बाबत जागा मालक सुनीता मदराणी यांनी त्या बाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने एमएमआरडीएचे आयुक्त श्री.आर.ए. राजीव यांना या सर्व इमारती निष्कासित करून अहवाल मागितला होता. त्या अनुषंगाने 3 मे 2021 रोजी नारपोली पोलीस बंदोबस्त व मोठया  फौजफाट्यासह अतिक्रमण हटवाण्यास सुरवात केली.
           मात्र अतिक्रमण निष्कासित करताना फक्त दोनच इमारतीचे मोठया प्रमाणावर नुकसान केले तर उर्वरित पाच इमारतीवर फक्त थातुरमातुर कारवाई केली आहे. याच परिसरात अजून शेकडो अनधिकृत इमारती उभ्या असून व सद्या इमारतीचें कामे सुरु आहेत. या ठिकाणी ईमारती निष्कासित करताना  एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष या अनधिकृत बांधकामाकडे गेले नाही का? असा सवाल ग्रामस्थांन मधून उपस्थित हो आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...