Friday, 7 May 2021

मनीलाल शिंपी याना डॉक्टरेट !

मनीलाल शिंपी याना डॉक्टरेट ! 


कल्याण, प्रतिनिधी :- कोमनवेथ व्होकेशनल युनिव्हर्सिटी टोंगा टप्पू किंगडम ऑफ टोंगा यांच्या कडून दिली जाणारी व मानाची डॉक्टरेट ही पदवी कल्याण डोंबिवली आर एस पी चे कमांडर मनिलाल शिंपी याना घोषित करण्यात आली आहे. 


आर एस पी चे महाराष्ट्र राज्य महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपले कार्य पाडत आहे. शिंपी सर हे कुशल संघटक; माणसे जोडणारे; चांगला स्वभाव; मदतशिल वृत्ती; शिक्षक हितचिंतक; उत्कृष्ठ क्रीडा प्रशिक्षक तसेच आर एस पी चे ब्रीद वाक्य असलेल्या "आपले जीवन सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात खरे करून दाखवणारे गरीब व गरजुंपर्यंत मदत पोचवणारे आर एस पी युनिट कमांडर कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा मनिलाल रतीलाल शिंपी  यांच्या कार्याची दखल घेत "कॉमन वेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, किंग्डम ऑफ टोंगा" यांचेकडून त्यांची आशिया पॅसफिक एक्सलन्स अवॉर्ड साठी निवड झाली आहे...

त्यांचा या यशाबद्दल शिक्षण विभाग आणि शिक्षक बंधू भगिनीं, क्रीडा संघर्ष समितीचे लक्ष्मण इंगळे, कृष्णा माळी महादेव क्षीरसागर, गजानन वाघ, विजय सिंग अध्यक्ष, पदाधिकारी, सन्माननीय टीचर्स हेल्प फाउंडेशन चे अध्यक्ष अविनाश ओंबासे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. पोलीस विभागाकडून, समाजातील सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचे हे सेवा कार्य असेच चालू राहण्यासाठी त्यांचे श्रमिक माध्यमिक विद्यालय कार्थदे येथील गुरुजन आर एस पटेल सर, वाघ सर, व्ही एस चौधरी, एस एन सोनवणे, एम एम पाटील यांचेकडून प्रेरणा मिळाली आहे. माझ्या या यशामध्ये कल्याण-डोंबिवली आर एस पी युनिटचे आर एस अधिकारी शिक्षक, अनिल बोरनारे, अनंत किनगे, राजेंद्र गोसावी, कैलास पाटील, बन्सीलाल महाजन, जितेंद्र सोनवणे, बापू शिंपी, दिलीप पावरा, विजय भामरे, दत्तात्रय पाटील, योगेश आहिरे, छोटू अहिरे, नितीन पाटील, भानुदास शिंदे, रितेश पाटील, यांच्यासह भांडुप आणि कुर्ला विभागाच्या महिला आर एस पी अधिकारी सौ रेखा प्रभू व भारती जाधव यांच्याही मोलाचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...