Thursday, 6 May 2021

खेड तालुक्यातील संगलट मधील तहानलेल्या वाड्यांची तहान मातोश्री ट्रस्ट भागवणार !

खेड तालुक्यातील संगलट मधील तहानलेल्या वाड्यांची तहान मातोश्री ट्रस्ट भागवणार !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर / समीर खाडिलकर) :

        मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनसे सरचिटणीस वॉटर मॅन (पाणी दूत) मनोज भाऊ चव्हाण, खेडचे लोकप्रिय नगराध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर व न्यू. इंग्लिश स्कुल कुर्ला बॅच १९८४ हे संगलट मधील तहानलेल्या गावांच्या मदतीला धावले आहेत. तहानलेल्या व पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलाची अडचण खेड नगराध्यक्ष यांच्या कानावर येताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मनसेचे वॉटरमॅन मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मनोज चव्हाण यांना संपर्क करुन मदतीचा हात मागितला. मनसेचे कोकणातील कार्यतत्पर दोन सरचिटणीस मिळुन ताबडतोब पाण्याची व्यवस्था केली व त्या वाड्यांना टॅंकर उपलब्ध करुन दिला. या टॅंकरचे श्रीफळ वाढवून खेड चे लोकप्रिय नगराध्यक्ष व मनसेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर शुभारंभ केला व जाहीर केले की, मातोश्री ट्रस्टचे मनोज चव्हाण व न्यू इंग्लिश स्कुल कुर्ला बॅच १९८४ यांच्या सौजन्याने पुढिल दिड महिना असाच पाणी पुरवठा सुरु राहिल. या प्रसंगी मनविसे मा जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, रजनीकांत जाधव, सुतार अविनाश वैद्य विभाग अध्यक्ष पियुष माने, पाटील, मणियार व प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...